Current affairs marathi tcs ibps pattern 2023 | चालू घडामोडी 2023
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं mpsc mentor या ब्लॉगवर,आता स्पर्धा कोणतीही असो त्यामध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा विषय असतो त्यामध्ये टीसीएस आणि आयबीपीएस यांची प्रश्न विचारण्याची काठीण्यपातळी जरा जास्तच असते, त्यामुळेच बरेच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत असतो मग यासाठी नेमकं अभ्यासासाठी कोणते संदर्भ वापरायचे यामध्येच मुलांचा गोंधळ उडतो त्यावर एक उपाय म्हणून आम्ही सर्व संदर्भांचा सखोल अभ्यास करून एक महत्त्वपूर्ण वन लाइनर current affairs marathi tcs ibps pattern 2023 | Current affairs marathi 2023 pdf आपल्यासाठी घेऊन येत आहोत,याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य चालू घडामोडी
- मराठी तितुका मेळावा विश्व संमेलनाचे आयोजन कोणत्या शहरात केले गेले - मुंबई
- महाराष्ट्रातील बेस्ट पोलीस युनिट पुरस्कार कोणत्या शहरांच्या पोलिसांना मिळाला - जालना आणि नागपूर पोलीस
- जी20 परिषदेच्या निमित्ताने कोणत्या शहरांमध्ये सायकल फेरीचे आयोजन केले होते - पुणे
- महाराष्ट्राच्या विशेष पोलीस आयुक्त पदी कोणाची निवड करण्यात आली - देवेन भारती
- महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो - 2 जानेवारी
- राष्ट्रीय महिला बुद्धिबळ शीर्षक राखणारी सर्वात तरुण खेळाडू - दिव्या देशमुख
- कामकाजात ई प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय - उस्मानाबाद
- कोणत्या शहरात काला घोडा कला महोत्सव साजरा केला - मुंबई
- 96 व्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 कोणत्या शहरात आयोजित केले गेले - वर्धा
- राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कधी साजरा करण्यात आला - 14 ते 28 जानेवारी दरम्यान
- 2023 चा महाराष्ट्र केसरी हा किताब कोणाला मिळाला - शिवराज राक्षे
- मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - संजय वी गंगापूरवाला
- कुणाला प्रथम डॉक्टर पतंगराव कदम स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले - आदर पूनावाला
- राज्यात बॅटरी स्वॅपिंग पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सोबत कोणत्या कंपनीने ऊर्जा भागीदारी केली आहे - गोगोरो आणि बेलारीज इंडस्ट्रीज
- भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारणार आहे - महाराष्ट्रातील पुणे येथे
- जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदींनी मुंबईत किती कोटी रुपयांचा विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले - 38 हजार कोटी
- मुंबईमध्ये आपला दवाखाना याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले ते कोणाच्या नावावर आहे - शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे
- भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणत्या शहरात येत आहे - पुणे
- लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते - महाराष्ट्र
- महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली- रमेश बैस
- जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर कोणत्या राज्यातील महामार्गावर स्थापन केला जाणार आहे - महाराष्ट्र, विदर्भ
- भिकारी मुक्त शहर हा उपक्रम कोणत्या शहरात सुरू केला आहे - नागपूर
- खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष श्री मनोज कुमार यांच्या हस्ते महिनाभर चालणाऱ्या खादी महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले - मुंबई
राष्ट्रीय चालू घडामोडी ( जानेवारी 2023 )
- भारतातील पहिली अंडरवाटर मेट्रो कुठे सुरू झाली - हावडा आणि कोलकत्ता या शहरा दरम्यान हुबळी नदीवर
- प्रजासत्ताक दिन परेड 2023 चा सर्वोत्कृष्ट राज्य झाकी पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला - उत्तराखंड
- ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मध्ये पुरुष एकल विजेतेपद कोणी जिंकले - नोव्हाक झोकोविच
- पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 चा शुभंकर काय - चिता आशा
- पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 चे यजमान राज्य कोणते होते - मध्य प्रदेश
- पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 चे विजेतेपद - महाराष्ट्र
- अमित शहा यांच्या हस्ते केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेची पायाभरणी कोणत्या राज्यात केली गेली - कर्नाटक
- जगातील पहिले पाम लीप हस्तलिखित संग्रहालय कोणत्या ठिकाणी - केरळ
- इजराइल देशातील हायफा बंदर कोणत्या समूहाने विकत घेतले - अदानी ग्रुप
- पूर्णपणे इ गव्हर्नन्स मोडमध्ये बदलणारा पहिला भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणता - जम्मू कश्मीर
- कोणता पक्ष जगातील पहिला पूर्णपणे डिजिटल पक्ष बनला - BJP
- ऑनलाइन मतदानाद्वारे सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार कोणी जिंकला आहे - गुजरात
- हेलिकॉप्टर निर्मिती प्लांट्स उद्घाटन कोणत्या राज्यात केले - कर्नाटक
- गगनयान मिशन पुढे नेण्यासाठी इसरो ने कोणासोबत भागीदारी केली - भारतीय नौदल
- एरो इंडिया 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले - कर्नाटक
- पहिला सुंदरबन पक्षी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला - पश्चिम बंगाल
- कोणता देश आपली पहिली महिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार- सौदी अरेबिया
- कोणत्या विधानसभेने समान नागरी संहितेच्या विरोधात ठराव मंजूर केला - मिझोरम
- कोणत्या वित्तीय कंपनीने विशेष G20 थीम कर कोड लॉन्च केला - paytm
- भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली - एम व्ही सुचिंद्र कुमार
- आयुर्वेदातील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आयुर्वेद व्यवसायांसाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला - SMART
- कोणत्या ठिकाणी सैनिकांना प्रथम थ्रीडी प्रिंटेड घरे सुपूर्द केली - अहमदाबाद
- भारतातील पहिला निलगिरी तहर प्रकल्प कोठे सुरू झाला - तमिलनाडु
- डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्था चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले - कोलकत्ता
- कोणत्या राज्यातील मतदानाचा टक्का 90% पेक्षा जास्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने मिशन 929 लॉन्च केले - त्रिपुरा
- साडी महोत्सवाचा दुसरा टप्पा विरासत कोणत्या शहरात संपन्न झाला - दिल्ली
- 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले - नागपूर
- राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांनी कोणत्या शहरात संविधान उद्यानाचे उद्घाटन केले - जयपुर राजस्थान
- प्रजासत्ताक दिन 2023 साठी कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे होते - इजिप्त ( अब्दुल फताह अलसीसी )
- इजराइल चे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे- बेंजामिन नेतन्याहू
- उत्तर प्रदेश ते आसाम मधील दिब्रुगड असा जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूज चे नाव काय आहे - गंगा विलास
- राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन साठी मंत्रिमंडळाने किती कोटी रुपये मंजूर केले - १९७४४
- केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली - प्रवीण कुमार श्रीवास्तव
- कोणत्या देशामध्ये ब्रेन इटिंग अमिबाशी संबंधित पहिला मृत्यू झाला - दक्षिण कोरिया
- भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्यावर धडा कोणत्या राज्याने अभ्यासक्रमात समाविष्ट केला - आंध्र प्रदेश
- भारतातील सर्वात मोठा विद्यार्थी उत्सव सारंग 11 जानेवारी 2023 रोजी कुठे साजरा करण्यात आला,- आयआयटी मद्रास
- सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क ने गेल्या महिन्यात पक्षांच्या किती नवीन प्रजाती शोधल्या आहेत - 17
- केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ईशान्य कृषी कुंभ 2023 चे उद्घाटन कोणत्या राज्यात केले - मेघालय
- भारताने कोणत्या देशाला मागे टाकून जागतिक स्तरावर तिसरे सर्वात मोठे ऑटो मार्केट बनले आहे - जपान
- धनु यात्रा महोत्सव सर्वात मोठा ओपन ए यर थेटर फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला - ओडिसा
- भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन आधारित तालचर खत प्रकल्प कोणत्या राज्यात 2024 पर्यंत तयार होईल - ओडिसा
- नवीन एकात्मिक अन्नसुरक्षा योजनेचे नाव काय करण्यात आले - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना
- भारताने वर्षाला बारा चिते आणण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे - दक्षिण आफ्रिका
- 15 वी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे - दक्षिण आफ्रिका
- पियुष गोयल यांनी स्टार्टअप MENTORSHIP साठी कोणते पोर्टल लाँच केले - MAARG
- पीएम मोदींनी विकसनशील राष्ट्रांना वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी कोणत्या प्रकल्पाची घोषणा केली - आरोग्य मैत्री
- भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियमक,PARAKH कोणत्या संस्थेने जारी केले आहे - NCERT
- अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने कोणती योजना बंद केली - पढो प्रदेश
- संसद खेळ महाकुंभ 2022-23 चे आयोजन कुठे करण्यात आले - उत्तर प्रदेश बस्ती जिल्हा
- भारतीय नौदलाच्या या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती - नारीशक्ती
- कोणती कंपनी आपल्या सीएनजी गाड्यांसाठी शेणाचा वापर करणार आहे - सुझुकी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे अंदमान आणि निकोबार मधील किती बेटांना नावे देण्यात आली - 21
- याया त्सो हे कोणत्या ठिकाणाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ आहे - लदाख
- राष्ट्रपती भवनातील मुघल उद्यानाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले- अमृत उद्यान
- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात मेगा डेअरीचे उद्घाटन केले - कर्नाटक
- इंडियन लायब्ररी काँग्रेसचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले - केरळ मधील कुन्नूर या जिल्ह्यात.
- कोणत्या राज्याच्या सरकारने महसूल पोलीस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे - उत्तराखंड
- हायड्रोजन मिश्रित PNG ( PIPED NATURAL GAS )प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला - गुजरात
- गान गाई हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला - मणिपूर
- गोव्यातील मोपा विमानतळाला कुणाचे नाव देण्यात आले - गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर
- दीदीर सुरक्षा कवच अभियान कोणी सुरू केले - ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल
- पुरुष हॉकी विश्वचषक 2023 च्या आधी भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम चे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले - ओडिसा राज्यात राऊरकेला.
- आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन कोणत्या राज्यात आहे - जम्मू आणि काश्मीर
- उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - पंकज कुमार सिंग
- इलेक्टराल डेमोक्रेसी इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे - 108
- स्टॅच्यू ऑफ बिलीव चे उद्घाटन कोणत्या राज्य अंतर्गत केले - राजस्थान
- महिलांच्या हक्कांसाठी जगातील सर्वात दडपशाही देश कोणता - अफगाणिस्तान
- वन नेशन वन चलन पुढाकार घेणारे पहिले राज्य कोणते - गुजरात
- राज्यातील पहिला पर्पल फेस्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता - गोवा
- महिलांना रोजगार देण्यात दक्षिण भारतातील कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे - चेन्नई
- अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते- राजस्थान
- प्रसिद्ध जल्लीकट्टू बैलगाडा स्पर्धा कोणत्या राज्यात साजरी झाली - तमिळनाडू
- भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला - कोल्लम (केरळ)
- सर्व आदिवासींना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा देशातील पहिला जिल्हा कोणता - वायनाड ( केरळ )
- देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे - केरळ
- चेरचेरा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला - छत्तीसगड
- कोणत्या राज्याच्या सरकारने राज्यात जातीय सर्वेक्षण सुरू केले आहे - बिहार
- भारतातील पहिला हरित ऊर्जा आधारित सौर पॅनल निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे - उत्तराखंड
- लाडली बहना योजनेची घोषणा कोणत्या मंत्र्यांनी केली - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण
आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी ( जानेवारी 2023 )
- ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली - इनासिओ लूला द सिल्वा
- 2023 हे वर्ष जगभरात कोणते वर्ष म्हणून पाडले जाणार आहे - बाजरी वर्ष
- हायड्रोजन आधारित ट्रेन लाँच करणारा जगातील दुसरा देश कोणता - चीन
- मधमाशांसाठी जगातील पहिली लस कोठे मंजूर केली आहे - अमेरिका
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक 2023 कोणत्या शहरात आयोजित केली - दावोस स्विझर्लंड
- चीनचे नवीन आणि सर्वात तरुण परराष्ट्रमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - किंन गॅंग
- COP28 हवामान चर्चेच्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती झाली - सुलतान अल जाबेर
- बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली - चेतन शर्मा
- मैत्री पाईपलाईन डिझेल पुरवठा कोणत्या देशादरम्यान सुरू करण्यात आली - भारत आणि बांगलादेश
- प्रमुख नियुक्त्या चालू घडामोडी ( जानेवारी 2023 )
- बिहार राज्य आयकॉन म्हणून निवडणूक आयोगाने कोणाची नियुक्ती केली - मैथिली ठाकूर
- BRO मध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय अधिकारी कोण - कॅप्टन सुरभी जाखमोला
- राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली - प्रवीण शर्मा
- नेमबाजी विश्वचषक 2023 चे प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - माजी न्यायाधीश ए के सिक्री
- टाटा ट्रस्ट ने कुणाला सीईओ म्हणून नियुक्त केले - सिद्धार्थ शर्मा
- टोयोटा ने नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली - कोझी सातो
- खान कामासाठी हायड्रोजन वर चालणारे ट्रक कोणती संस्था वापरणार आहे - अदानी इंटरप्राईजेस
- भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ठरले आहे - दिल्ली
- हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे - 85 ( प्रथम क्रमांक जपान)
- जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत कोणत्या अभिनेत्याने टॉम क्रूजला मागे टाकले आहे - शाहरुख खान( आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेता)
- वर्ष 2023 साठी सर्वात मौल्यवान आयटी सेवा ब्रँड कंपनी म्हणून कोणती संस्था प्रथम क्रमांकावर आहे -TCS
- ग्लोबल 500 या ताज्या अहवालानुसार भारतातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून कोणती संस्था आहे? - रिलायन्स जिओ
अर्थव्यवस्था चालू घडामोडी
- 2023 ते 25 या कालावधीसाठी कोणत्या बँकेने मध्यम मुदतीची रणनीती फ्रेमवर्क उत्कर्ष 2.0 लाँच केले - रिझर्व बँक ऑफ इंडिया
- 2022 23 च्या पहिल्या सहा माहित भारतीय अर्थव्यवस्था किती टक्के ने वाढली - 9.7%
- 2022 मध्ये रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलन साठा किती बिलियनने घसरला - $ 70.1 बिलियन
- एकूण पेट्रोल पुरवठ्यामध्ये किती टक्के इथेनॉल मिश्रणाची पातळी गाठण्याचा सरकारचा उद्देश आहे - 20%
- भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट म्हणून काम करण्यासाठी रिझर्व बँकेकडून कोणत्या बँकेला मंजुरी मिळाली आहे - पेटीएम बँक
- शिखर परिषद चालू घडामोडी जानेवार2023
- पाण्यावरील पहिली अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्री परिषद ची थीम काय होती - वॉटर विजन @2027
- B20 ( business 20) इंडिया इन्स्पेक्शन मीटिंग कुठे झाली - गांधीनगर गुजरात
- चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे यजमान म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली - हैदराबाद
- थिंक 20 ची बैठक कोणत्या शहरात झाली - भोपाळ
विज्ञान आणि तंत्रज्ञान चालू घडामोडी जानेवारी 2023
- इस्रो 2023 मध्ये कोणत्या तीन महत्त्वाच्या मोहिमा आखणार आहे- आदित्य L1, गगनयान आणि चंद्रयान 3
- स्पेसेक्स कंपनीने कॅलिफोर्निया मधून किती स्टार लिंक उपग्रह प्रक्षेपित केले -51
- कोणत्या अंतराळ संस्थेने 2027 पर्यंत अणुऊर्जेवर चालणाऱ्या रॉकेटची चाचणी करणार असे स्पष्ट केले - NASA
- भारतातील पहिली INTRANOSAL कोविड लस कोणती आहे - INNCOVACC
- सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे पहिले मिशन कोणते असणार आहे - आदित्य L1
- आयआयटी मद्रास फर्मने कोणती स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली आहे - BharOS
पुरस्कार चालू घडामोडी जानेवारी 2023
- वर्ल्ड हॅबिटॅट अवार्ड 2023 कोणत्या राज्याने जिंकला - ओडिसा
- ओडकुझल पुरस्कार 2022 साठी कोणाची निवड झाली - अंबिका सुतन मंगड ( प्राणवायू या लघुकथा संग्रहासाठी )
- 32 वा व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले - ज्ञान चतुर्वेदी
- संतोषी ट्रॉफी 2023 कोणी जिंकली आहे - कर्नाटक
- हावर्ड लॉ स्कूल सेंटर ने अवार्ड फॉर ग्लोबल लीडरशिप पप्राप्तकर्ता म्हणून कोणाला घोषित केले - सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड
- गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून कोणत्या गाण्याची निवड झाली - नाटू नाटू
- 2023 ऑस्कर साठी भारताकडून कोणता चित्रपट निवडला गेला आहे - द काश्मीर फाइल्स
- 71 वी मिस युनिव्हर्स 2022 चा ताज कोणी जिंकला - आर बोनी गॅब्रिएल
- कोणत्या विमानतळाला सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफिल्ड विमानतळ पुरस्कार मिळाला - गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ
- भारतातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून कोणत्या पोलीस स्टेशनला गौरविण्यात आले - ओडिशातील आस्का पोलीस स्टेशन
- पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले - डॉ. प्रभा अत्रे
- पद्मविभूषण 2023 महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला मिळाला - श्री झाकीर हुसेन ( कला क्षेत्र )
क्रीडा चालू घडामोडी जानेवारी 2023
- कोणत्या राज्याच्या हॉकी महिला संघाने खेलो इंडिया युथ गेम 2022 जिंकले - हरियाणा
- भारताचा 78 वा ग्रँडमास्टर कोण ठरला - कौस्तव चॅटर्जी
- रणजी ट्रॉफी मध्ये पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला - जयदेव उनाडकट
- भारताचा 79 वा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे - प्रणेश एम
- भारताच्या कोणत्या प्रसिद्ध टेनिसपटू ने निवृत्तीची घोषणा केली आहे - सानिया मिर्झा
- WPL लिलाव मध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली - स्मृती मंधना 3.4 कोटी
- t20 मध्ये सर्वात जलद पंधराशे धावा करणारा खेळाडू कोण ठरला आहे - सूर्यकुमार यादव
- देशातील 81 वे ग्रँडमास्टर कोण ठरले आहे - सायंतन दास
- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू कोण ठरला - विराट कोहली
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला - शुभमन गिल
- भारतातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा एम एस धोनीचा विक्रम कोणी मोडीत काढला - रोहित शर्मा
- महिला अंडर 19 t-20 विश्वचषक कोणी जिंकला - भारत
- हॉकी विश्वचषक 2023 मध्ये जर्मनीने कोणत्या देशाचा पराभव केला - बेल्जियम
पुस्तके आणि लेखक चालू घडामोडी जानेवारी 2023
- ब्रेकिंग बॅरियर्स हे पुस्तक कोणी लिहिले - काकी माधवराव ( माजी IAS)
- भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर "क्रांतिकारी" हे नवीन पुस्तक कोणी लिहिले - संजीव संन्याल
- जादू नामा - अरविंद मंडलोई
- ब्रेविंग अ व्हायरल स्टोर्म : इंडियाज कोविड-19 वैक्सीन स्टोरी - आशिष चांदोरकर
- द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिक्स - ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ मेघनाथ देसाई
संरक्षण चालू घडामोडी जानेवारी 2023
- सियाचीन मध्ये कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या - कॅप्टन शिवा चव्हाण
- भारत सरकार आणखी किती k-9 वज्र टॅंक खरेदी करणार आहे - 100
- सुखोई फायटर जेट ची पहिली भारतीय महिला पायलट कोण - अवनी चतुर्वेदी
- वीर गार्डियन 2023 संयुक्त हवाई सराव कोणत्या दोन देशांमध्ये होणार आहे - भारत आणि जपान
- अभ्यास चक्रीवादळ हा पहिला संयुक्त सराव कोणत्या दोन देशादरम्यान केला जातो - भारत आणि इजिप्त
- भारतीय नौदलामध्ये पाचवी कलवरी श्रेणीची पाणबुडी दाखल होणार आहे तिचे नाव काय आहे - वगीर
- AMPHEX 2023 मेघा सराव कोणाद्वारे आयोजित केला गेला - भारतीय नौदल
- भारताच्या ईशान्य भागात प्रलय सराव कोणाद्वारे केला गेला - भारतीय हवाई दल
- भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढवण्यासाठी बीएसएफ ने कोणता सराव आयोजित केला होता - आप्स अलर्ट
- भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख कोण आहे - ए पी सिंग
महत्त्वाचे दिवस जानेवारी 2023
- 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन
- 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती
- 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस
- 6 जानेवारी जागतिक युद्ध अनाथ दिवस
- 9 जानेवारी 17 वा प्रवासी भारतीय दिवस
- 10 जानेवारी विश्व हिंदी दिवस
- दहा ते 16 जानेवारी 2023 दरम्यान - स्टार्ट अप इंडिया इनोवेशन विक
- 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस
- 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन
- 15 जानेवारी 75 वा भारतीय लष्कर दिन
- 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस
- 19 जानेवारी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स दिवस
- 23 जानेवारी पराक्रम दिवस (नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती )
- 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन / राष्ट्रीय बालिका दिन
- 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस
- 26 जानेवारी भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन
- 29 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन
0 टिप्पण्या