आनंदाची पंचसूत्री | marathi motivational quote
दुःख का होते मनुष्य निराशेत का जातो नकारात्मक भावना बदलता येतात का हे अलीकडचे चिंतेचे मुद्दे बनले आहेत तरुणांमध्ये वाढते ताण तणाव करिअरची चिंता या धर्तीवर मनुष्य मुद्दाम आनंद निर्माण करू शकतो का आनंद निर्माण करणारी संप्रेरक कोणती या दिशेने झालेल्या संशोधनाचा गोषवारा बघूया. marathi motivational quote
1. एंडोर्फिन असं वाढवा : इंडोरफिन हे संप्रेरक तणाव वेदना कमी करण्यास मदत करतं ते वाढण्याचा एकमेव आणि प्रभावी उपाय म्हणजे व्यायाम करणे होय. व्यायामानं शारीरिक हालचाली वाढल्यामुळे एनर्फिन पाझरत. शिवाय हृदयाची गती वाढणारा कोणताही व्यायाम तुमच्या शरीरात आणि मनात सकारात्मक भावना निर्माण करतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना किमान अर्धा तास नित्यनेमाने कोणताही आळस न करता दररोज व्यायाम करायला हवा.
2. सेरेटोनिन असं वाढत : मानवी शरीराची रचना निसर्गाला अनुकूल आणि निसर्गाच्या कुशीत वाढण्यासाठीच निर्माण केली गेली. ताज्या हवेत श्वास घेतल्यानंतर तुमच्या मेंदूतल्या ऑक्सिजनच्या पातळीसह सेरेटोनिन हार्मोन वाढते. कोवळ्या उन्हात उभं राहिल्यानंतरही सेरेटोनिन ची मात्रा वाढते.
3. प्रेम संप्रेरक : ऑक्सिडॉसीन संप्रेरकाला प्रेम संप्रेरक असंही म्हटलं जातं. इतरांप्रती दयाळू पणा दाखवल्याने शरीरात ऑक्सिटोसीन सोडला जातो. जो तणाव कमी करणारा हार्मोन आहे. तो शरीरात स्नेह विश्वास बंधन आणि सहानुभूती यांच्या प्रदर्शनामुळे वाढतो. तसंच जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपला मेंदू डोपामाईन आणि सेरेटोनिन सोडतो. या दोन्ही न्यूरो ट्रान्समीटरमुळे आपल्याला तात्विक बरं वाटतं आणि आपली हिम्मत वाढण्यास मदत होते. म्हणूनच आधुनिक जगात परस्पर संवादाची जपणूक करायला फार महत्त्व आहे
फक्त ते वरवरचे नसावेत हृदयातून असावेत.
तणाव मुक्त होण्यासाठी :
तणाव मुक्त होण्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे हसणं होय
हसल्यामुळे डोपामाईन आणि एनडॉरफीनचे स्तर वाढण्यास मदत होते अगदी जवळच्या व्यक्तीसोबत दिलखुलास हसण्यानं ऑक्सिडोसीनची पातळी वाढते ऑक्सिडोसिन हायपोथिलामस मध्ये तयार होतं आणि पिट्युरी ग्रंथी द्वारा रक्तात सोडलं जातं हसण्या नंबर यात समस्या दूर होतात हे संशोधनाद्वारे सिद्ध झालं आहे.
marathi motivational quote
0 टिप्पण्या